भू – समृद्धी® सेंद्रिय खत करंज पेंड

शेतीमध्ये वापरल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या अखाद्य पेंडींमध्ये भू समृध्दी® करंज पेंड एक महत्वाचे सेंद्रीय खत आहे. यामध्ये अन्नद्रव्ये पुरवठयाबरोबरच किड व रोग प्रतिकारक गुणधर्म अंगभूत असल्याने एकात्मिक अन्नद्रव्य व किड रोग व्यवस्थापनामध्ये भू समृध्दी® करंज पेंडीचा चांगला उपयोग होतो. पिकांचे सर्वांगीण आरोग्य, फुले व फळांची वाढ, फळांचा दर्जा तसेच उत्पादनामध्ये भू समृध्दी® करंज पेंडीच्या वापराने लक्षणीय वाढ होते.

भु समृद्धी® करंज पेंड मधील घटक

घटक प्रमाण
नत्र ४ – ५ %
स्फुरद (P2O5) ०.५ – १.० %
पालाश (K2O) १ – २ %
प्रथिने २५ – ३५ %

या शिवाय ह्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

ह्या घटकांचे प्रमाण प्रातिनिधीक स्वरुपाचे असून यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.

भू समृध्दी® करंज पेंडीचे फायदे

  • मुख्य, दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रीय स्वरुपात भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात.
  • किड व रोगनाशक गुणधर्मांमुळे विविध प्रकारच्या किडी, रोग तसेच सूत्रकृमींपासून पिकांचे संरक्षण होते.
  • रासायनिक खतासोबत सहजपणे वापरता येते व भू समृध्दी® करंज पेंडीच्या वापरामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.
  • जमिनीच्या सेंद्रीय कर्बात वाढ होऊन जमिनीतील सुक्ष्म जिवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.
  • भू समृध्दी® करंज पेंडीमध्ये सुक्ष्म स्वरुपात पिक वाढीस उत्तेजन देणारी संप्रेरके असल्याने पिकांची सर्वांगीण वाढ होते.
  • जमिनीचे भौतीक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारुन सुपिकतेत वाढ होते.
  • पिकांची सर्वांगीन वाढ होऊन किड, रोग व वातावरणातील बदलांविरुध्द पिकांची प्रतीकारशक्ती वाढते.

वापरण्याचे प्रमाण:

एकरी ३०० ते ५०० किलो शक्यतो लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.

या शिवाय रासायनिक खत देताना १:१ या प्रमाणात मिसळून द्यावे.

उपलब्धता:

५० किलो बॅग

Back to Top