सेंद्रिय शेतीमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी विविध प्रकारच्या खाद्य तसेच अखाद्य पेंडींचा वापर केला जातो. त्यामध्ये शेंगदाणा पेंड ही प्रथिनांनी सर्वात जास्त समृध्द असते. यामधील नत्र प्रथिनांच्या स्वरुपात असल्याने याचा वापर केल्यानंतर प्रथम जमिनीतील सुक्ष्म जिवाणूंच्या वाढीला प्रोत्साहन मिळते. हे सुक्ष्म जिवाणू पेंडीचे हळूहळू विघटन करुन त्यामधील नत्र पिकांना उपलब्ध करुन देतात. नत्राबरोबरच स्फुरद व पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. शिवाय दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाणही पेंडीमध्ये असल्याने पिकांची सर्वच अन्नद्रव्यांची गरज भागवली जाते.
| घटक | प्रमाण |
| नत्र | ६ – ८ % |
| स्फुरद (P2O5) | १ – ३ % |
| पालाश (K2O) | १ – ३ % |
| प्रथिने | ४० – ५० % |
या शिवाय ह्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.
ह्या घटकांचे प्रमाण प्रातिनिधीक स्वरुपाचे असून यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.
एकरी ३०० ते ५०० किलो शक्यतो लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.
या शिवाय रासायनिक खत देताना १:१ या प्रमाणात मिसळून द्यावे.
४० किलो बॅग