कत्तलखान्यातील टाकावू पदार्थ व पशूंच्या हाडांचा चुरा पिकांसाठी सेंद्रिय खत म्हणून उपयोगी ठरतो. यामध्ये प्रामुख्याने स्फुरद हा घटक असून तो पिकांना थोडया थोडया प्रमाणात दिर्घकाळापर्यंत उपलब्ध होत राहतो. त्याच बरोबर भू - समृद्धी® (बोन मील) मध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अशी प्रथिने, कॅल्शियम व इतर पोषक अन्नद्रव्ये असतात. बोन मील चा वापर प्रामुख्याने मुळांच्या वाढीसाठी व लागवड केलेल्या रोपांना लवकर जोम फुटण्यासाठी केला जातो. परिणामी झाडांची भरघोस वाढ होऊन फुले व फुलधारणेचे प्रमाण वाढते. जमीनीमधील उपयुक्त सुक्ष्म जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करण्याचे काम भू - समृद्धी® बोन मील मुळे होते. त्याच बरोबर जमीनीची जडणघडण सुधारुन पिक वाढीस प्रोत्साहन मिळते.
घटक | प्रमाण |
एकुन स्फुरद (P2O5) | २२ – २२.५ % |
उपलब्ध स्फुरद (P2O5) | १७ - २० % |
एकरी ३०० ते ५०० किलो शक्यतो लागवडीच्या वेळी जमीनीतून द्यावे.
या शिवाय रासायनिक खत देताना १:१ या प्रमाणात मिसळून द्यावे.
४० किलो बॅग