जिप्सम

जिप्समचा भुसुधारक म्हणुन वापर

सोडियम क्षारामुळे बाधीत चोपण जमिनींच्या सुधारणेसाठी वापरले जाणारे जिप्सम हे एक महत्वाचे भुसुधारक आहे. याव्यतीरिक्त गंधकाची कमतरता असणार्‍या जमिनींमध्ये गंधकयुक्त खत म्हणुन जिप्समचा वापर केला जातो. यामुळे उत्पादनात भर पडण्यास मदत होते.

जिप्सम वापरानंतर जमिनीत घडणार्‍या रासायनिक अभिक्रीया

जिप्सम (कॅल्शियम सल्फेट) + चोपण जमिन = कॅल्शियमयुक्त जमिन + सोडियम सल्फेट (पाण्यासोबत वाहून जाण्यायोग्य)

तयार झालेले सोडियम सल्फेट जमिनीमधुन जोराचा पाऊस किंवा भरपूर पाणी देऊन बाहेर काढुन टाकता येतो. जमिन चोपण नसेल तर जिप्समचा प्रभावीपणे वापर होत नाही.

मातीचा सामू ६.५ पर्यंत खाली आणण्याकरीता लागणरे जिप्सम (टन)

अ.नं. मातीचा सुरवातीचा सामू जिप्सम (टन)
८.५ ५.० – ६.५
८.० ३.५ – ५.५
७.५ २.०- २.५

मातीच्या पृष्ठभागावर जिप्सम फोकून दिले जाते. ज्या जमिनींमध्ये जिप्सम वापरून जमिनीची जडणघडण सुधारणे अपेक्षित असेल ह्या जमिनींमध्ये जिप्सम पेरणी लागवडीपुर्वी जेवढे लवकर वापरता येईल तेवढे चांगले. फोकून दिल्यानंतर जिप्सम मातीमध्ये चांगले मिसळायला हवे.

पाऊस किंवा जास्त पाणी देऊन सोडियमचे मातीच्या वरच्या थरातील क्षार पाण्यासोबत बाहेर किंवा जमिनीच्या खोल थरांमध्ये वाहून नेले जातात, ज्यामुळे वाढणार्‍या मुळांभोवती सोडियमचे प्रमाण कमी होते. जिप्समचे प्रमाण, हंगाम आणि जमिनीचा प्रकार यांचा काळजीपूर्वक विचार करून वापरावे.

जिप्समच्या अतिवापरामुळे रोपांचे नुकसान होऊन अन्नद्रव्यांचे संतुलन बिघडू शकते.

Back to Top